पुण्यामधून मोठी बातमी! NIA ची संशयित दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे. NIA ने संशयित दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. संशयित असलेल्या आरोपींची मालमत्ता NIA कडून जप्त करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरातील एकूण ४ मालमत्ता NIA कडून जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित दहशतवादी राहत असलेला फ्लॅट देखील NIA कडून जप्त केला आहे.
NIA कडून याप्रकरणी आणखी चार दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
दरम्यान, सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आलं आहे. मालमत्ता जप्त केली गेली म्हणजे एनआयएला आणखी काही मोठी माहिती मिळाली का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.