पुण्याच्या वाहतुकीत उद्यापासून नवीन नियम लागू ; वेग मर्यादा 30 किलोमीटर प्रतितास, कठोर कारवाई….


पुणे : पुण्यातील नवले पुलावर काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने या पुलाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात येणार आहे. येत्या २५ नोव्हेंबर पासून सर्व वाहनांसाठी नवीन वेगमर्यादा निश्चित केली आहे. कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा ३० किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे.शिवाय या मर्यादांचे पालन न केल्यास त्या चालकांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे- मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बायपास मार्गावर होणाऱ्या वाढत्या अपघाताचे प्रमाण तसेच वाहतूक कोंडी लक्षात घेऊन वाहनासाठीची वेग मर्यादा ताशी 60 km वरून ताशी 30 किलोमीटर करण्यात आली आहे.पुणे शहर वाहतूक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता वेगमर्यादा ठरवल्याने वाहन चालकांनी नियमांचे कठोर पालन करावे असं आवाहन करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न केल्यास सीसीटीव्ही, स्पीड गनने लक्ष ठेवून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान नियम बदलल्या नंतर तरी या पुलावरील अपघाताचे प्रमाण कमी होणार का? आणि मृत्यूचा सापळा बनलेला नवले पूलाचा टॅग पुसणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा ३० किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे.यापूर्वी फक्त नवले पुलावर वेगमर्यादा ठरवण्यात आली होती. आता भूमकर चौक ते नवले ब्रीजपर्यंत ही वेगमर्यादा ठरवण्यात आली आहे. मात्र या नव्या वेगमर्यादेमुळे वाहतुक कोंडी होण्याचीही शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!