Hero Karizma पुन्हा एकदा बाजार उठवणार!! शानदार मायलेजसह मार्केटमध्ये येणार


 

 

मुंबई : सध्या हिरोची नवीन बाईक लाँच होणार आहे. लाँच झाल्यानंतर आगामी बाईक मार्केटमधील इतर कंपन्यांच्या बाईकला जोरदार टक्कर देणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजारात आता Hero Karizma ही शानदार बाईक पुन्हा एंट्री करणार आहे.

कंपनी अनेक दिवसांपासून या बाईकवर काम करत आहे. नवीन Hero Karizma मध्ये, कंपनी 210 cc ऑइल कूल्ड 4 वाल्व मोटरसह मजबूत इंजिन देण्याची शक्यता आहे.
तसेच हे इंजिन कंपनीच्या 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडले जाणार आहे.

तुम्हाला आगामी बाईकमध्ये उत्तम फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळणार आहे. ABS, ड्युअल टर्न LED इंडिकेटर, स्पीडोमीटर, मायलेज मीटर, डिजिटल डिस्प्ले, ड्युअल डिस्क ब्रेक्स, फुल LED लाइटिंग, स्टायलिश टेल लॅम्प यांसारखे अनेक शानदार आणि आकर्षक फीचर्स या बाईकमध्ये दिले जाण्याची शक्यता आहे.

या बाईकला बाजारात 2 ते 2.25 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर तुम्हालाही मस्त बाईक घ्यायची असल्यास हिरोची ही आगामी बाइक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!