सुनेत्रा पवार यांनी जपला अजित पवार यांचा वारसा; झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देऊन जपली धर्मनिरपेक्ष विचारांची साक्ष…


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी झिशान सिद्धीकी यांना अखेर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत काल एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक नावे चर्चेत होती आणि काही ज्येष्ठ नेतेही या शर्यतीत होते.

शेवटी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव अगोदरपासूनच आघाडीवर होते, मात्र अंतिम निर्णय आज घेण्यात आला.

बाबा सिद्धीकी यांच्या निधनानंतर झिशान सिद्धीकी यांना राजकारणात मोठी जबाबदारी मिळू शकते, अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर पक्षात त्यांच्या नावाला अधिक बळ मिळाले.

कमी वयात झिशान सिद्धीकी यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या नावाला पाठिंबा दिल्याची माहिती आहे.दरम्यान, विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी अनेक इच्छुक नेते प्रयत्नशील होते. मात्र अखेर झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!