Nawab Malik : नवाब मलिक यांना मोठा दिलासा, कोर्टाने दिला कायमस्वरूपी जामीन…

Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक यांना कायमस्वरूपी वैद्यकीय जामीन दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील नवाब मलिकांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं नवाब मलिकांना वैद्यकीय कारणांसाठी तात्पुरता जामीन दिला होता. त्यावेळी मलिकांनी जामीन अर्जात आपल्याला किडनी, लिव्हर, हृदयाशी संबंधित अनेक शारीरिक व्याधी असल्याचे नमूद केले होते. आता याप्रकरणी नवाब मलिकांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून कायम करण्यात आला आहे. Nawab Malik
हायकोर्ट निकाल देईपर्यंत नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन कायम राहणार आहे. म्हणजे नवाब मलिक आता जेल बाहेरच राहणार आहेत. आज ईडीच्या वकिलांनीही याबाबत आम्हाला कोणतीही शंका नसल्याचे सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले. न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्यासमोर आज सुप्रीम कोर्टात झाली सुनावणी.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर नवाब मलिक हे नाव चर्चेत आलं. त्यांनी त्यावेळेच NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. नवाब मलिक यांची मोठी मुलगी निलोफर यांचे पती समीर खान यांना सुद्धा एनसीबीकडून अटक झाली होती.