देशभरात खळबळ! माजी पंतप्रधानाच्या नातवाचा कारणामा, तुरुंगात मोबाईल अन् फोनमध्ये पॉर्न व्हिडिओ….


नवी दिल्ली : बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला जनता दल (सेक्युलर) चा माजी खासदार प्रज्वल रेवन्ना बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत आहे. खासदार राहिलेला आणि माजी पंतप्रधानांचा नातू असलेला रेवन्ना चक्क तुरुंगातच पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

त्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईल आणि इतर डिव्हाइस जप्त केले आहेत. मोबाईलचा फॉरेन्सिक तपास केल्यानंतर रेवन्नाच्या फोनमध्ये डझनभर पॉर्न व्हिडिओ सापडले आहेत. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी तुरुंगात छापेमारी केली होती. त्यावेळी रेवन्ना तुरुंगात मोबाईलचा वापर करत असल्याचं आढळून आलं होतं.

त्यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला आहे. प्रज्वल रेवन्ना हा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांचा पुतण्या आहे. फोनमध्ये डझनभर पॉर्न व्हिडीओ आणि पेन ड्राइव्हमध्ये वेब सीरीज आढळून आल्या आहेत. त्यामुळे रेवन्ना तुरुंगात पॉर्न व्हिडीओ पाहात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर रेवन्नाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी या तुरुंगात अचानक छापेमारी केली होती. त्यावेळी रेवन्ना मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसून आलं होतं. रेवन्नाच्या कोठडीतून अधिकाऱ्यांनी हायसेक्युरिटी बॅरेकमधून एक चार्जर, एक पेन ड्राइव्ह आणि एक नोटबुक जप्त केले होते.

त्यानंतर जप्त करण्यात आलेला मोबाईल आणि पेन ड्राईव्ह फॉरेन्सिक चौकशीसाठी पाठवण्यात आला. तसेच या निमित्ताने बंगळुरू तुरुंगात व्हिआयपी कैद्यांना मिळणाऱ्या खास सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. रेवन्नाच्या तुरुंगात मोबाईल आढळल्याने एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!