‘नाथाभाऊंचे जावईच रेव्ह पार्टीचे आयोजक…..; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

पुणे : पुणे पोलिसांनी खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. या पार्टीमध्ये सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.आरोपीत आमचे नेते नाथाभाऊंचे जावई आहेत आणि तेच या पार्टीचे आयोजक होते. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खराडीतील एका लॉजमधील फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीमधून पोलिसांनी दोन महिला आणि पाच पुरुषांना ताब्यात घेतल आहे पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ,दारू, हुक्काचं सेवन केलं जात होतं. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. दरम्यान कारवाई सुरू असताना घटनास्थळावरून तीन तरुणी पळून जाण्यात यशस्वी झाल्या या फरार तरुणींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या सर्व प्रकरणावर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी नाथाभाऊंचे जावई पार्टीचे आयोजक असल्याचं म्हटल आहे.तिथे नक्की पाच महिला होत्या की तीन, याबाबत सध्या माहिती नाही. तपासाअंती सगळं स्पष्ट होईल, असं महाजन यांनी म्हटलं आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी पार्टीवर बोलताना एकनाथ खडसे यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ते म्हणाले, हे खूप मोठे प्रकरण आहे, कालच नाथाभाऊ चाळीसगावला गांजावर भाष्य करत होते. मग त्यांचे जावई कसं काय सापडले? त्यांनी जावईबापूंना अलर्ट करायला हवं होतं ना? असा टोला त्यांनी लगावला.या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.