Nana Patole : नाना पटोलेंचं मोठं विधान म्हणाले, माझा EVM वर आक्षेप नाही, तर…

Nana Patole : विधानसभा निवडणुकीत राज्यात स्थिर सरकारसाठी जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा सत्तेत बसवले. मात्र, महायुतीच्या सत्तेचा घोळ मिटला नाही.
महायुती सरकारचा नवा मुख्यमंत्री कोण, कोणत्या पक्षाला कोणते खाते मिळणार यावर अजूनही तोडगा निघाला नाही. तर पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर खापर फोडायला सूरूवात केली आहे.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी निकालानंतर पत्रकार परिषद देऊन ईव्हीएममध्ये गडबडी झाल्याचा आरोप करत पुरावे सादर केले होते. यानंतर आता मविआचे नेते ईव्हिएमविरोधात आंदोलन पुकारणार आहेत.
दरम्यान, असे असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यथक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केले आहे. माझा EVM वर आक्षेप नसल्याचे विधान नाना पटोलेंनी केले आहे. त्यामुळे पटोलेंच्या या विधानानंतर मविआच्या नेत्यांच्या भुवय्या उंचावल्या आहे. Nana Patole
नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावर बोलताना पटोले म्हणाले की, कोण मुख्यमंत्री ठरेल? याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेते निर्णय घेतील.
त्यामुळे त्यावर आम्ही काय बोलणार नाही. नाना पटोले पुढे ईव्हिएमवर बोलताना म्हणाले की, माझा ईव्हिएम मशीनवर नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली वर आक्षेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.