नाना गायकवाड व गणेश गायकवाड यांची ‘या’ कारागृहात रवानगी ; येरवडा कारागृहात केला होता राडा..
पुणे : पुणे शहर व पिंपरी चिंचवड येतील मोक्क्यातील आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड व त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांची येरवडा कारागृहातून अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
कैदी नानासाहेब गायकवाड याने येरवडा कारागृहात असताना फिर्यादीवर दबाव टाकण्याच्या प्रयत्न केला होता. तर गणेश गायकवाड याने मोबाईलचा वापर करत फिर्यादीला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती.
तसेच नानासाहेबने त्याचा भावाला भेटण्यासाठी कारागृह प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रकार केला होता. महिला तुरुंग अधिका-यासमोर अर्वाच्च भाषेत आरडा-ओरड करत गैरवर्तन करत कारागृह शिस्त व नियमांचे उल्लंघन केले होते.
दरम्यान याप्रकरणी गैरवर्तनाचा तसा अहवालच जेल प्रशासनाने न्यायालयात सादर केला होता. त्यावर न्यायालयाने परवानगी देत त्यांना कोणत्याही न्यायालयात वर्ग करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार त्यांची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.