Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नमो शेतकरीचा चौथा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत होणार जारी, जाणून घ्या..

Namo Shetkari Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. अशीच एक योजना आहे पी एम किसान सन्मान निधी योजना. ही योजना केंद्रीय पुरस्कृत आहे. केंद्रातील मोदी सरकारने २०१९ मध्ये या योजनेची सुरूवात केली.
येत्या काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील शिंदे सरकार नमो शेतकरी च्या पात्र शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा पुढील हप्ता देणार आहे.
नमो शेतकरीचा पुढील चौथा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जुलै महिन्याच्या अखेरीस जमा होणार आहे. ३१ जुलै पर्यंत या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकरकमी मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते. एका आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. Namo Shetkari Yojana
आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सतरा हप्ते जमा झालेले आहेत. दरम्यान केंद्राच्या याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात. म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान चे ६००० आणि नमो शेतकरीचे ६००० असे एकूण १२ हजार रुपये मिळतात. जें शेतकरी पीएम किसान साठी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी साठी पात्र ठरतात.
नमो शेतकरी चे सर्व नियम, निकष आणि स्वरूप हे पीएम किसान योजनेसारखेच आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने पैशांचे वितरण केले जाते.