भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर ; फडणवीस स्पष्टच म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून…

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नाव भाजपाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच आता खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीचं स्पष्ट भूमिका मांडली आहे.मी पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार असून महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची नेमणूक गेल्या दीड वर्षांपासून रखडलेली आहे. भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.त्यावरही फडणवीस सविस्तर बोलले. भाजप अध्यक्ष पदासाठी कोणत्याही प्रकारचा पेच नाही. भाजप अध्यक्ष पदासाठी अनेक नावांची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. मात्र भाजपमध्ये एक व्यक्ती निर्णय घेत नाही, तर पक्ष ठरवत असतो,’ असं फडणवीस यांनी सांगितलं. मला जिथपर्यंत भाजपची कार्यपद्धती माहीत आहे, त्या आधारे मी इतकं नक्कीच सांगू शकतो की मी पुढील ५ वर्षे महाराष्ट्रातच आहे. पाच वर्षांनंतर पक्ष जो निर्णय घेईल, तसं होईल,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सध्याच्या घडीला कोणताही पेच नाही. अध्यक्ष पदाची निवडणूक लवकरच होईल. भाजपचा अध्यक्ष होणारा नेता तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा असेल, असं फडणवीस यांनी ठासून सांगितलं.
