नागपुरी खर्रा जीवावर बेतला, मित्राने घेतला मित्राचा जीव, वाद वाढला अन् घडलं आक्रीत…


नागपूर : नागपुरी तर्री पोहे यासोबत नागपुरी खर्रा प्रसिद्ध आहे. नागपुरातील अजनी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये राहणाऱ्या एका युवाकांने सोबतच काम करणाऱ्यांना खर्रा मागितला. खर्रा न दिल्याने भांडण झाले. या भांडणात हातातील कड्याने डोक्याला मारले.

यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र दोन दिवसांनी दिवसांनी त्रास झाल्यानं मेडिकलमध्ये दाखल केले. उपचार सुरू होताच काही तासात त्याचा मृत्यू झाला. आर्यन वहिले मृतक तरुणाचे नाव आहे. राहुल हजारे आणि नागेश मेश्राम असं मारेकऱ्याचं नाव आहे.

या घटनेमध्ये रात्री भांडणं झालं होतं. त्यानंतर तब्बल 48 तासानंतर त्याला त्रास झाल्यानंतर रुग्णलयात गेला. तेव्हा त्याचा मृत्यू झाला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्याची प्रकृती बिघडली त्यामुळे त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी नेले.

यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आर्यनचे वडील विलास वहिले यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.पोलिसांनी या प्रकरणात चोकशी दोन आरोपी राहुल आणि नागेश या अटक करून पुढील तपास करत आहे.

पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी केली असून वैद्यकीय अहवालात डोक्याला लागलेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तपासात हे स्पष्ट झाले आहे की ही घटना पूर्वनियोजित नव्हती आणि मृत्यू अपघातीरित्या झाल्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल न करता भारतीय दंड संहितेच्या 304 (अ) म्हणजेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास अजनी पोलीस करत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!