महाविकास आघाडीतील २० ते २२ आमदार आमच्या संपर्कात ; उदयोग मंत्री उदय सामंत यांचा दावा…!


माढा : आघाडीतील २० ते २२ आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ते माढा तालुक्यातील टेंभुर्णीत आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते.
त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणे खिलाडूवृत्ती शिकावी असेही सामंत म्हणाले. यापुढे येणारे महापालिकेचे मैदान असो, लोकसभेचे असो अथवा विधानसभेचे सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

बच्चू कडू यांच्या संपर्कात आघाडीमधील १० ते १२ आमदार आहेत. तर ८ ते १० आमदार माझ्या संपर्कात असल्याने एकूण २० ते २२ आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी टेंभुर्णीत केला.

यापुढे येणारे महापालिकेचे मैदान असो, लोकसभेचे असो अथवा विधानसभेचे सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टेंभुर्णीत शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी सामंत यांच्यासह ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, शिंदे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत उपस्थित होते.