महापालिकेचा कारनामा ; कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटीं निधी वळवला, पुण्यातील तब्बल ८०० कामे रखडली

पुणे : पुणे शहराच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जातात. ही वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी कात्रज कोंढवा रस्त्याचा प्रकल्प आखला जात आहे.पुण्यामधील कात्रज-कोंढवा रस्त्याच्या बांधकामासाठी आता पुणे महानगरपालिका प्रशासनाने २०० कोटींची निधी वळवला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शहरातील ८०० नागरी कामे रखडली आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्याच्या बांधकामासाठी २०० कोटी रुपयांचा निधी वळवण्यासाठी पुणे शहरातील ८०० हून अधिक प्रस्तावित नागरी कामे रखडली आहेत. नागरी कामांमध्ये प्रामुख्याने नागरी सुविधांची दुरुस्ती, देखभालीची कामे असल्याचे म्हटले जात आहे. राजस सोसायटी ते खादी मशीन चौक मार्गे पिसोलीपर्यंत ३.५ किमी लांब आणि ८४ मीटर रुंद कात्रज-कोंढवा रस्ता बांधण्यासाटी २००८ मध्ये सुरुवात झाली होती. प्रकल्पासाठी खासगी जमीन संपादित करण्यात यश न मिळाल्याने हे काम प्रलंबित आहे, असे पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. आता या रस्त्यासाठी निधी वळवल्याने 800 कामे रखडल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पुण्यातील रस्ते, फूटपाथ आणि गटार दुरुस्तीसाठी देण्यात आलेला निधी महानगरपालिका प्रशासन कात्रज ते कोंढवा रस्ता तयार करण्यासाठी वापरणार आहे. इमारत विकास विभागाकडून देखील निधी या कामासाठी वळवाल जाणार आहे. ‘कात्रज-कोंढवा रस्ता महत्त्वाचा आहे, पण त्याचे बांधकाम बराच काळ थांबले आहे. आता यासाठी निधी उपलब्ध केल्याने याचे काम सुरळीत चालू होणार आहे.

