मुंबईच्या मरीन ड्राइव्हर खळबळ ; समुद्रात तरुणीचा आढळला मृतदेह, चेहऱ्यावर भयानक जखमा पोलिसांकडून तपास सुरू..


मुंबई : मुंबईच्या प्रसिद्ध असणाऱ्या मरिन ड्राईव्ह परिसरातील समुद्रात एका तरूणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तरूणीच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या. तरूणीचा मृतदेह समुद्रात सापडल्यानंतर कफ परेड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. या तरुणीची हत्या झाली आहे की आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मनिता गुप्ता (वय वर्ष २४) अशी तरूणीची ओळख पटली आहे. तरूणी २ दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. तरूणी बेपत्ता झाल्यानंतर कफ परेड पोलिसांना कळवण्यात आले.तरूणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या मिसिंगची केस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, तरूणीचा समुद्रात मृतदेह आढळल्यानंतर या घटनेमागील गुढ अधिक वाढले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.तरूणीचा मृत्यू नेमका कसा झाला? तिचा मृतदेह नेमका कुणाला आणि कधी सापडला? तरूणीची हत्या करण्यामागे कारण काय? तरूणीच्या चेहऱ्यावर जखमा कसल्या होत्या? तरूणीची हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, तरूणीची ओळख पटली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे. या घटनेमुळे मुंबईकरांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!