Mukhyamantri Vayoshri Yojana : आता ज्येष्ठांसाठी सरकारची नवी योजना, मिळणार ३००० रुपये, योजना आहे तरी काय? जाणून घ्या सर्व माहिती…


Mukhyamantri Vayoshri Yojana : राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ न मिळालेल्या पात्र महिलांना ३००० रुपये दिले जात आहेत.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही योजने जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. तसेच राज्यात समाजकल्याण विभागाची जेष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली वयोश्री योजना काढण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील नागरिकांना ३००० रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये ४८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बँक खात्यांमध्ये ३ हजार रुपयांसह वृद्धावस्थेमुळं ज्यांना ऐकण्यात, दिसण्यास आणि चालण्यास अडचण येते अशा वृद्धांना चष्मा, श्रवणयंत्रासह अनेक आवश्यक उपकरणं देण्यात येतात. Mukhyamantri Vayoshri Yojana

महाराष्ट्रात ५ फेब्रुवारी २०२४ रोजी वयोश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयोश्री योजनेची घोषणा केली होती. वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून ३००० रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात. यासाठी काय कागदपत्रे लागतात? पात्रता काय? कुठे अर्ज करायचा? जाणून घेऊयात संपूर्ण माहिती….

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ३००० रुपये रोख आर्थिक मदत करण्यात येते. तसेच काही आवश्यक उपकरणंही त्यांना देण्यात येतात. यात खालील उपकरणांचा समावेश आहे.

चष्मा, ट्रायपॉड, कमरेसंबंधीचा पट्टा, फोल्डिंग वॉकर, ग्रीवा कॉलर, स्टिक व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, श्रवणयंत्र इ.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र?

अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा.
अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
राज्यातील किमान ३० टक्के महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

आवश्यक कागदपत्रे…

आधार कार्ड, ओळखपत्र, आय प्रमाण पत्र, जात प्रमाणपत्र, स्वत: ची घोषणा प्रमाणपत्र, समस्येचे प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, इत्यादी कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करायचा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!