संतोष देशमुखांचे पोस्टमार्टम करणाऱ्या सर्जनचा नवा कारणामा उघड, उडाली खळबळ, वाल्मिक कराडबर संबंधही आले पुढे…


बीड : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला रोज नवे कारनामे समोर येत आहेत. याबाबत आरोपी वाल्मिक कराड बाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वाल्मिक कराडविषयी सातत्याने आवाज उठवला आहे.

आता दमानिया यांनी बीडचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्या म्हणाल्या, अंबेजोगाई येथील हॉटेल पियुष इन कोणाचे आहे याची चौकशी करण्यात यावी. हे हॉटेल डॉ. अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत.

डॉ. अशोक थोरात हे पूर्वी नाशिकला होते आणि नंतर बड्या व्यक्तीच्या आशीर्वादाने त्यांची बदली बीडला झाली. दमानिया यांच्या या आरोपानंतर ‘हॉटेल पियुष इन’ नेमके कोणाच्या मालकीचे आहे आणि डॉ. अशोक थोरात यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

तसेच त्या म्हणाल्या, अशोक थोरात जे आताचे सिव्हिल सर्जन आहेत, त्यांच्याबद्दल मी काही माहिती घेत होते, तेव्हा मला असं कळालं की ते राजकीय इन्कलाइन पर्सन आहेत. त्यांना लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक लढवायची होती. असा मोठा खुलासा त्यांनी केला आहे.

तसेच त्यांची आधी नाशिकला ट्र्न्सफर झाली, मात्र त्यानंतर परत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे त्यांची बदली बीडला करण्यात आली, असा दावा दमानिया यांनी केला आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!