शाळेत जाताना रडते, जेवत नाही त्रास देते म्हणून आईने मुलीला मारलं, घटनेने सोलापूर हादरलं….

सोलापूर : येथील एका महिलेने आपल्या सावत्र चिमुकल्या मुलीची हत्या केली आहे. या महिलेने तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळला आहे. यामुळे एळच खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये ही घटना घडली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. या घटनेने परिसरातून एकच संताप व्यक्त केला जात आहे. चिमुरड्या लेकीची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने सगळेच हळहळले आहेत. कीर्ती नागेश कोकणे असे हत्या झालेल्या तीन वर्षीय दुर्दैवी मुलीचं नाव आहे.
पोलिसांनी सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे हिला अटक केली आहे. मुलगी जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही, अशा कारणांवरून या सावत्र आईने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून खून केला. यामुळे या घटनेची राज्यात चर्चा सुरू आहे. याबाबत मोहोळ पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काही महिन्यांपासून सावत्र आई तेजस्विनी या दोन्ही सावत्र मुलींचा सतत छळ करत होती. जेवण न करणे किंवा शाळेत जाण्यास नकार देणे यांसारख्या कारणांवरून ती मुलींना बेदम मारहाण करत होती.

यामुळे रागाच्या भरात तेजस्विनी कोकणे या महिलेने कीर्तीचा गळा दाबून तिची हत्या केली. या गंभीर प्रकरणात फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात तेजस्विनी कोकणे हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.