पुण्यात मोक्काचे आरोपी ‘छावा’ पाहायला आले अन् पोलिसांच्या तावडीत सापडले! पुण्यातील वैभव टॉकीजमध्ये थरार…


पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला असताना, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर येथील वैभव टॉकीजमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली.

ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने केली आहे. धर्मेनसिंग ऊर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय २२) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (वय २३, दोघेही रा. शिव कॉलनी, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांवर मोक्का एनडीपीएस आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट सहाने कोम्बिंग ऑपरेशन राबवले. त्यावेळी अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना आरोपींविषयी माहिती मिळाली. आरोपी ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी वैभव टॉकीजमध्ये आल्याचे समजल्यानंतर सहायक निरीक्षक मदन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने कारवाई करत आरोपींना अटक केली.

त्यांना पुढील तपासासाठी दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आता या आरोपींवर गंभीर आरोप आहेत का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत पोलिसांनी आधीच माहिती घेऊन ही कारवाई केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा आरोपींचा अडचणीत वाढ झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!