Mohan Bhagwat : आता सरसंघचालक मोहन भागवत यांना मोदींच्या दर्जाची सुरक्षा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Mohan Bhagwat : देशात सध्या महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत वाढ केली जात आहे. यामध्ये गेल्या आठवड्यात शरद पवार यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. मोहन भागवत यांची सुरक्षा झेड प्लसवरून वाढवून अॅडव्हान्स सिक्योरिटी लायजन करण्यात आली आहे. जी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना आहे. ही एक देशातील सर्वात मोठी सुरक्षा मानली जाते. Mohan Bhagwat
मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवल्यानंतर त्यांना कुणापासून धोका आहे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मोहन भागवत यांच्या सुरक्षेची माहिती घेतल्यानंतर पंधरवड्यापूर्वीच सुरक्षा वाढविण्याला अंतिम रूप देण्यात आले. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मोहन भागवत वेगवेगळ्या राज्यांच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत ढिलाई आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मोहन भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेत सीआयएसएफमधून डेप्युटेशनवर आलेल्या अधिकारी आणि सुरक्षारक्षकांचा समावेश होता.
ही सुरक्षा अपग्रेड करून अॅडव्हान्सड सिक्योरिटी लायजन करण्यात आली आहे. याबाबत सरसंघचालक कट्टर इस्लामिक संघटनांसह अनेक संघटनांच्या निशाण्यावर आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.