आज राजकीय मंचावर काय घडणार? मोदी पवार एकाच मंचावर, कार्यक्रमाला सुरुवात…
पुणे : लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यास सुरूवात झाली असून या कार्यक्रमाच्या सुरूवातील पंतप्रधान मोदी यांना टिळकांनी लिहिलेल्या गितारहस्य पुस्तकाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुशिलकुमार शिंदे इत्यादी नेते मंचावर उपस्थित आहेत.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी एसपी कॉलेज परिसरात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे मोदींचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुण्याच्या मंडई परिसरात जमलेले विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दगडूशेठ मंदिरात पूजा आणि आरती केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कर सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत. आता अगदी थोड्याच वेळात एसपी कॉलेजच्या मैदानात या कर्यक्रमाला सुरूवात होणार आहे.