शेतकऱ्यांनी जगावं की मरावं? आता कांद्याचे दर रोखण्यासाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मोठा धक्का…


पुणे : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कांद्याचे भाव पडले आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा फुकट विकल्यासारखा विकला होता. आता कांद्याच्या दरात काहीशी वाढ झाली होती.

यामुळे आता कांद्याचे दर रोखण्यासाठी सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार बफर स्टॉकमधून 3 लाख मेट्रिक टन कांदा खुल्या बाजारात सोडणार आहे. यामुळे आता याचा काय परिणाम होणार हे लवकरच समजेल.

सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर नियंत्रणात येतील. परंतु याचा सर्वात मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांनी करायचे काय.? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच २०२०-२१ मध्ये केवळ १ लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक करण्यात आला होता. परंतु यावर्षी त्यात वाढ केली आहे. कांद्याची साठवणूक करताना मोठ्या प्रमाणात नासाडी होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.

याच पार्श्वभूमीवर भाभा अणुसंशोधन केंद्राशी करार देखील केला आहे. यावर्षी बफर स्टॉकसाठी ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. जर गरज पडली तर सरकारकडून आणखी काही कांद्याची खरेदी केली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!