Model Tania Singh suicide : प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंगची आत्महत्या, आयपीएलमधील प्रसिद्ध क्रिकेटर चौकशीच्या फेऱ्यात, शेवटचा कॉल ठरले कारण..
Model Tania Singh suicide : प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंगने आत्महत्या केली आहे. अवघ्या २८ वर्षी तानियाने आयुष्य संपवल्याने धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येच नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही मात्र, तिच्या फोन मध्ये असलेल्या लास्ट कॉलने पोलिसांच लक्ष वेधले आहे.
इंडियन प्रीमियर लीग मध्ये सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्मा याचा लास्ट कॉल तिच्या फोनवर आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अभिषेक आता पोलिसांच्या तपासाच्या रडारवर आली आहे. सुरतमधील प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंगच्या आत्महत्येनंतर स्थानिक पोलिसांनी तिच्या चौकशी करत आहेत.
कारण पोलीस तपासात समोर आले आहे की, मॉडेल तानियाने २३ वर्षांच्या अभिषेकला शेवटचा कॉल केला होता. अशा परिस्थितीत पोलीस अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी या अष्टपैलू खेळाडूला चौकशीसाठी बोलावले आहे. या खेळाडूला हैदराबादने ६.५ कोटी रुपयांना खरेदी केले. Model Tania Singh suicide
दरम्यान, तानिया आणि अभिषेक काही काळापासून संपर्कात नव्हते, पण अभिषेक त्यांचा मित्र असल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले, अशी माहिती समोर आली आहे.
२८ वर्षांची तानिया फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करायची. इंस्टाग्रामवर त्याचे १०,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये ती डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल असल्याचे लिहिले आहे.