पुण्यात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराचे उत्खनन करा, अन्यथा…,मनसेने दिला थेट इशारा !


पुणे : गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मशीद मंदिर यावरून वातावरण तापले आहे. आता पुणे शहरातील ऐतिहासिक पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर आहेत. पण त्या मंदिर परिसरात दर्ग्याच अतिक्रमण असून ते हटविण्यात यावे.

या दोन्ही मंदिराचे उत्खनन केले जावे. त्यातून सत्य परिस्थिती निश्चित समोर येईल. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरात दर्ग्याच अतिक्रमण आहे.ते अतिक्रमण हटविण्यात यावे. अशी मागणी मनसेने केली आहे.

 

 

 

 

 

 

याबाबत हे सर्व महिन्याभरात राज्य सरकारने करावे. अन्यथा मनसैनिकांवर उत्खनन करण्याची वेळ आणू नका. असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

 

 

 

 

 

 

दरम्यान, गुढीपाडवा सणाच्या दिवशी मुंबईत झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम येथील दर्ग्या बाबत मांडलेल्या भूमिकेच्यानंतर पुढील काही तासात तो दर्गा हटविला गेला आहे. त्या कारवाईच आम्ही स्वागत करीत असून आता पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराचे उत्खनन करण्यात यावे. तसेच मंदिर परिसरातील अतिक्रमण देखील हटविण्यात यावे.अशी आमची मागणी आहे, आता काय होणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!