सांगलीत अल्पवयीन मुलीने आयुष्य संपवलं, गोपीचंद पडळकरांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी, धक्कादायक माहिती आली समोर..

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. याठिकाणी अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी आमदार सुहास बाबर व आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांचे एकमेकांवर हस्तक्षेपाचे आरोप केले आहेत. यामुळे याची चर्चा सुरु आहे.

याबाबत दोन्ही गटांकडून आमदाराची कॉल डिटेल्स तपासणीची मागणी केली जात आहे. यामुळे प्रकरण वेगळ्या वळणावर गेले आहे. आमदार सुहास बाबर व आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी एकमेकांवर हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. या दोन्ही गटांकडून आमदारांच्या कॉल डिटेल्सच्या तपासणीची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत भाजप तालुकाध्यक्षांकडून आमदार सुहास बाबर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला. तसेच बाबर यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपकडून देण्यात आले आहे. यामुळे हे प्रकरण तापले आहे. याबाबत सखोल तपासाची मागणी केली जात आहे.

तसेच शिंदे गटाकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता केली जात आहे. आटपाडी पोलिसांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेते अनेक वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत येत आहेत. याबाबत अनेक आमदार मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात ही प्रकरणे अजूनच तापणार आहेत. याकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यानी लक्ष देणे आवश्यक आहे.