मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डी. लिट पदवीने सन्मानित…!


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डी वाय पाटील विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम डी वाय पाटील स्टेडीयमवर पार पडला. कोरोना काळात रुग्णांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळात नागरिक आणि रुग्णांना वैद्यकीय सोयी, ऑक्सिजन आणि रुग्णालयातील खाटा, रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नांसाठी आणि सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनिय कामासाठी त्यांना डीलीट प्रदान करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांना डीलीट प्रदारन करताना महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली तेव्हा राबवलेले मदत कार्य, कोल्हापूर आणि महाड येथे आलेल्या महापूरावेळी केलेल्या कामाचा या वेळी विशेष उल्लेख करण्यात आला. या कामामुळेच त्यांना डीलीट पदवीने सन्मानित करण्या येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

डी.लीट पदवी नेमकी काय आहे?

डॉक्टर ऑफ लिटरेचर (D.Litt.) ही एक शैक्षणिक पदवी आहे. ज्याला उच्च डॉक्टरेट असेही म्हटले जाते. जी काही देशांमध्ये पीएचडी (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) च्या पलीकडे मानली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीने विशिष्ठ क्षेत्रात किंवा त्याच्या क्षेत्राच्या बाहेर केलेल्या विद्वत्तापूर्ण कामगिरीची ओळख म्हणून अनेक देशांमध्ये विद्यापीठे आणि विद्वान संस्थांकडून ही पदवी दिली जाते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!