Milk Rate : ऐन दिवाळीत दूध उत्पादक संकटात, दरात झाली मोठी घसरण…

Milk Rate : सध्या सणासुदीचा काळात पशुपालकांना मोठा धक्का बसला आहे. या दिवसात दुधाला चांगली मागणी असते. परंतु याच काळात दुधाचे दर प्रचंड कमी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून दुधाचे दर कमी झाले असताना सणासुदीच्या काळात देखील दर कमी झाल्याने पशुपालक वर्ग अडचणीत आला आहे.
पाच-सहा महिन्यांपूर्वी गाईच्या दुधाचे दर ३८ रुपये इतके होते. मात्र ते आता थेट २७ रुपयांपर्यंत खाली आले आहे. महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी २६ रुपये दर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच राज्यातील दूध उत्पादकांना भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. Milk Rate
तसेच यंदा देशातील अनेक राज्यात पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पशुखाद्याचे दर खूप वाढले आहेत. पशुपालकांना चारा जास्त किमतीने विकत घ्यावा लागत आहे. एकंदरीतच दूध व्यवसाय पुन्हा अडचणीत आल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी सरकारकडून गाईच्या दुधाचे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने अभ्यास करून गाईच्या दुधाला कमीत कमी ३४ रुपये दर देण्याचे निश्चित केले होते.
यानुसार दूध संघांनी देखील २१ जुलैपासून ३.५ फॅट आणि ८.५ ‘एसएनएप’ला ३४ रुपये दर द्यायची घोषणा केली होती. परंतु रिटर्नचे दर वाढवून एसएनएफच्या प्रतिपॉईंटला ३० पैशाऐवजी १ रुपये व फॅटच्या प्रतिपॉईटला २० पैशांऐवजी ५० पैसे कपात सुरु केली. दूध दरावरून पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.