पुण्यात मध्यरात्री थरार ; रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मित्राकडूनच खून, पोलीस आरोपींच्या शोधात..

पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार बादल शेख याचा खून त्याच्याच मित्रांनी केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्याच तीन साथीदारांनी त्याची हत्या केलीआहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले असुन पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरातील प्यासा हॉटेलसमोर रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. बादल शेख असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्याच मित्रांनी त्याच्यावर अचानक चाकूने वार केला. हल्ल्यात बादल शेख गंभीर जखमी झाला आणि त्याच्या घटनास्थळीच मृत्यू झाला.मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हल्ल्यानंतर पसार झाला आहे. सध्या वाघोली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार रात्री खराडी परिसरात सगळ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्यातून त्यांच्या जोरदार भांडण झाले. याच भागात असलेल्या एका लॉज येथील यातील एक जण आला. त्याने तिथे रूमची चौकशी केली. यावेळी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. हा वाद इतका टोकाला गेला की, तिघांनी बादल शेखवर शस्त्राने वार केला.त्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केली.वाघोली परिसरातील लोक या खुनाच्या घटनेने हादरले आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके नियुक्त केली असून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील विविध मार्गांवर चौकशी सुरू आहे.

