परतीच्या पावसाची विश्रांती ! काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज …….
पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या मुसळधार पावसाने जोर धरला होता. परंतू मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली आहे. दरम्यान, आजही काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पुढील महिन्यात शनिवारपर्यंत राज्याच्या बहुतेक भागांत उघडीप असणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून जोरदार पाऊस पडणार नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील चार दिवस आकाश अंशता ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यत ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी हलक्या ते स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.