Meera Borwankar : मीरा बोरवणकरांचा आणखी एक गौप्यस्फोट, नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकरांविरोधात होते सबळ पुरावे; पण…

Meera Borwankar पुणे : माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी पुणे हिंसाचारावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करत नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सध्याच्या परिस्थितीत राजकीय नेते पॉवरफुल झाले आहेत आणि आम्ही पोलीस प्रशासक , बदल्या आणि पोस्टींगसाठी राजकीय नेत्यांवर अवलंबून राहिलो आहोत. हे समजासाठी चांगले नाही. असे मीरा बोरवणकर म्हणाल्या आहेत. Meera Borwankar
माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर म्हणाल्या की, ज्यावेळी नीलम गो-हे, Neelam Gorhe मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा होता. त्यावेळी आमच्याकडे फार टेक्निकल पुरावा होता. पुणे बंदमध्ये हिंसाचार कसा करावा याबाबत एकदम मस्त पुरावा होता.
माझे अधिकारीच मला तेव्हा म्हटले, मॅडम गुन्हा दाखल करू नका, आम्हाला तुम्हाला मुंबई पोलीस आयुक्त म्हणून पाहायचे आहे. त्यामुळे त्यावेळी मी खूप दबावाखाली होते. आपण जर असे केले तर आपल्याला पोलीस आयुक्त पद देण्यात येणार नाही. पोलीस अधीक्षक पद मिळणार नाही असा खुलासा त्यांनी केला आहे.
त्याचसोबत अजित पवारांना मीडिया व्हिलन करतेय, पण मी जे घडलंय ते पुस्तकात लिहिलंय. व्हिलन तेव्हा होतो जेव्हा शासकीय जमीन आपण देऊन टाकली असती. पुणे पोलिसांना हा प्रस्ताव मान्य नाही असं आपण जेव्हा शासनाच्या निदर्शनास आणले. आम्ही ३ एकर जागा देणार नाही. त्यामुळे शासनाने आदेश मागे घेतले. माझ्या विरोधाची मला किंमत चुकवावी लागली. पण वाईट वाटले नाही. कारण हा योग्य निर्णय होता. मला निवृत्त होऊन ६ वर्ष झालीत, कुठल्याही पदाची अपेक्षा नाही.
मी पुस्तक वर्षभरापूर्वीच लिहिलंय, प्रकाशन उशीरा झाल्या. त्यामुळे टायमिंगबाबत आरोप चुकीचा आहे असंही मीरा बोरवणकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कुठल्याही राजकीय पक्षाला एकदम रोखठोक अधिकारी आवडत नाही. आपण कुठल्याही एका पक्षाला जबाबदार धरू शकत नाही. जे अधिकारी त्यांचे सांगणे ऐकतील असेच राजकीय नेत्यांना आवडतात असेही बोरवणकरांनी सांगितले आहे.