Mauli Katke : यशवंत व घोडगंगेला मदत करण्यासाठी विधानसभेत साकडे! पुरवणी मागण्यांत घोडगंगा कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची आमदार ज्ञानेश्वर कटकेंची थेट मागणी…

Mauli Katke उरुळीकांचन : शिरुर -हवेली विधानसभा मतदारसंघातील यशवंत सहकारी साखर कारखाना तसेच घोडगंगा सहकारी कारखाना चालू करण्यासाठी राज्य सरकारने निधीची तरतूद करावी अशी मागणी करुन घोडगंगा सहकारी साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणून भ्रष्टाचार करुन बंद पाडणाऱ्या संचालक मंडळाला बरखास्त करण्याची थेट मागणी शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चासत्रात शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी सहभाग घेऊन मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नांना मोकळी वाट करुन दिली आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी पुरवणी मागणीत यशवंत आणि घोडगंगा कारखान्यांना अर्थिक मदतीची मागणी केली. ते म्हणाले शिरूर -हवेली मतदारसंघात दोन सहकारी साखर कारखाने आहेत. दोन्ही कारखाने बंद अवस्थेत आहे. यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करणे बाबत महाराष्ट्र शासनाने विशेष निधीची तरतूद करून हा कारखाना चालू करावा अशी मागणी केली आहे.
शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी कारखाना हा संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे कर्जबाजारी होऊन, बंद पडला आहे. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास ३० ते ३५ लाख टन ऊस उपलब्ध आहे. परंतु गेली २५ वर्ष ज्यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर सत्ता आहे , त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून सभासदांच्या मालकीचा साखर कारखाना बंद पाडला आहे. Mauli Katke

या कारखान्याची सर्व कर्ज खाती एन पी ए मध्ये गेलेली आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ८३ कोटीच्या कर्जापोटी कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश काढलेले आहेत. कारखान्याची ३५ कोटी रुपयांची देनी थकीत आहे. कारखाना बंद असल्यामुळे, शेतकरी वर्गाचे, कामगार वर्गाचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे या कारखान्यावरील संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर केली आहे.