बारामती कचरा डेपोला भीषण आग, ८० लाखांचे नुकसान; कचरा वर्गीकरणाच्या यंत्रणा जळून खाक…


बारामती : बारामती येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोस आज (ता.२४) पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करणारी विविध प्रकारची यंत्रणा तसेच कचरा जळून खाक झाला आहे.

या आगीमुळे जवळपास ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे .या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. आगीमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करणारी विविध प्रकारची यंत्रणा त्याचबरोबर कचरा जळून अक्षरशः खाक झाला आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याच्या कारणांचा शोध नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे घेत आहेत. आज पहाटे दोनच्या सुमारास कचरा डेपोला आग लागल्याची माहिती समजल्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा डेपो कडे धाव घेतली.

ही आग अतिशय भीषण होती. या आगीमध्ये बारामती नगरपालिका तसेच लुको कंपनीची कचरा वर्गीकरण करणारी जवळपास सात ते आठ यंत्रे जळून भस्मसात झाली आहेत.

याशिवाय वर्गीकरण केलेला जवळपास ९००टन गठ्ठे बांधून ठेवलेला कचरा देखील जळून खाक झाल्यामुळे जवळपास ४० लाख रुपयांचे कचऱ्याचे तर यंत्रणेचे जवळपास २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या ठिकाणी दोन वॉचमन सातत्याने कार्यरत असतात तसेच नगरपालिकेने सीसीटीव्ही यंत्रणादेखील बसविलेली आहे, मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नसल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!