६ दिवसांपूर्वी लग्न, २ वर्षापूर्वी नौदलात दाखल, लेफ्टनंट विनय नरवालांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…


जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० पेक्षा अधिक जखमी असल्याचे वृत्त आहे. काश्मीर खोऱ्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ माजली आहे.

दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्यात नौदलाच्या एका २६ वर्षीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. विनय नरवाल असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. आठवडाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पत्नीसोबत काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते. या घटनेने त्यांच्या गावी एकच शोककळा पसरली आहे.

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदलाचे अधिकारी विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. करनालच्या सेक्टर-7 मध्ये राहणारे विनय दोन वर्षांपूर्वी नौदलात भरती झाले होते आणि सध्या लेफ्टनंट पदावर कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

नौदलात भरती झालेले विनय नरवाल यांनी आपल्या शौर्याने देशसेवेची सुरुवात केली होती. विनय यांचा १६ एप्रिल रोजीच विवाहसोहळा संपन्न झाला होता. लग्नानंतरच्या ते हनिमूनसाठी काश्मीरमध्ये गेले होते. पहलगाममध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!