Maratha Reservation : दिवाळीच्या सुट्यांतही मराठा नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर, राजगडला सापडल्या हजारो कुणबी नोंदी..

Maratha Reservation : राज्यात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण केलेमनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर शासनाने तालुकास्तरावर नोंदी तपासण्याचे आदेश दिले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या सुट्यांतही महसूल विभाग युद्धपातळीवर मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधत आहे.

तसेच वेल्हे तालुक्यातील भोर संस्थान काळातील राजगड तालुक्यात गावोगावचे सर्वच मराठे कुणबी असल्याच्या नोंदी मिळाल्या आहेत. वेल्ह्यातील २२ गावांच्या एकट्या अंबवणे मंडलात केवळ जन्म-मृत्यूच्या रजिस्टरमध्येच दोन हजारांहून अधिक कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या आहेत. मांगदरी येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळेत सर्व मराठे कुणबी जातीचे असल्याचे पुढे आले आहे. Maratha Reservation
वेल्हे तहसीलदार कार्यालयाच्या रेकॉर्डरूममध्ये कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात असल्याने तहसीलदार दिनेश पारगे यांनी दोन मोडीवाचकांच्या साह्याने नोंदी शोधण्याचे काम सुरू केले आहे. तीन दिवसांत अबंवणे मंडलातील २२ गावांचे तब्बल १८७० ते १९८४ पर्यंतच्या ७८ वर्षांतील नोंदी तपासण्यात आल्या.

त्यात दोन हजारांहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या, तर मांगदरी शाळेत ३२ कुणबी नोंदी सापडल्या. या शाळेत १८९० पासून दाखल रजिस्टरमध्ये कुणबी म्हणून चोरगे, मरळ, देशमुख, शिळीमकर, मांगडे, शिंदे आदींचा समावेश आहे.
