Maratha Reservation : लातुरमध्ये मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या, चिट्ठी लिहिली, मोबाईलवर स्टेट्स ठेवला अन् सगळ संपवले…


Maratha Reservation :  सध्या राज्यात मराठा आरक्षण हा मुद्दा पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लातूर येथील मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसतीगृहात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रदीप निवृत्ती मते पाटील असे या विद्यार्थ्यांच नाव आहे. आज (ता. १२) सकाळी सात वाजता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहिती नुसार, प्रदीप हा बीएएमएसच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. बीड जिल्ह्यातील लोणी येथील तो रहिवासी होता. आत्महत्येपूर्वी रात्री मराठा आरक्षण राजकारण यावर त्याने मित्रांशी चर्चा केली.

तसेच कुटुंबीयांना फोन करून बोलला. सकाळी त्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोबाबाईलवर स्टेस्टस ठेवले तसेच मराठा आरक्षण # अशी चिठ्ठी लिहून ठेवली. Maratha Reservation

रूममधील मित्राला सांगितले, तू बाहेर बस तुला लाईटचा त्रास होईल, मी अभ्यास करणार आहे. मित्र बाहेर जाताच त्याने दरवाजा आतून लाऊन घेतला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!