Maratha Reservation : आरक्षणाच्या लढ्यात अजून एक बळी! आता ३० वर्षीय विवाहित तरुणाने संपवले आयुष्य, विहिरीत उडी मारली अन्…

Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारने तातडीने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली जात आहेत.
एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, असं आवाहन करत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी गेल्याचे समोर येत आहे. Maratha Reservation

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका ३० वर्षे तरुणाने विहीरीत उडी घेऊन आपला जीव दिला असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. सोमवारी (ता.३०) सायंकाळच्या सुमारास घटना घडली आहे.


स्वपान बाबुराव कचरे असे आत्महत्या करणारा तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, जालना तालुक्यातील कचरेवाडी या ठिकाणचा स्वपान रहिवासी होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वपान गेल्या काही दिवसापासून आंदोलन करत होता मात्र मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याची माहिती त्याला मिळतात तो अस्वस्थ झाला आणि त्याने जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.
आरक्षणाची सतत मागणी करून देखील सरकार कोणताच निर्णय घेत नसल्याने स्वपान निराश झाला आणि याच नैराश्यातून त्याने टोकाची भूमिका घेत शेतामधील विहिरीत उडी घेऊन जीव दिला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मराठा बांधवांसाठी आणि स्थानिक पोलिसांनी धाव घेतली.
यानंतर त्याचा मृतदेह विहिरी मधून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. माहितीनुसार स्वपानचे लग्न झालेले असून त्याला एक सहा वर्षाची मुलगी आणि चार वर्षाचा मुलगा आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली आहे केली जात आहे.
