Maratha Reservation : मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का, मराठा आरक्षणासाठी खासदारांनी दिला राजीनामा…

Maratha Reservation : सध्या राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी पाणी ग्रहण न करण्याचा देखील निश्चय केला आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
त्यांनी याबाबत एक पत्र लिहून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामाचे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामुळे आता इतर खासदार देखील राजीनामा देण्याची शक्यता आहे.
त्यांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा बांधव एकत्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. यामुळे सध्या काय होणार हे लवकरच समजेल