Maratha Reservation : मराठा आरक्षणावर मोठी बातमी, न्यायालयाने दिले हे महत्त्वाचे आदेश, जाणून घ्या…


Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर राज्य सरकाराने मराठा समाज मागस असल्याचा अहवालानुसार १० टक्के आरक्षण दिले. या दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीत कुठलीही भरती ही न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहील, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे. या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारच्या निर्णयानंतर १० टक्के आरक्षण हे पोलीस भरती, शिक्षक भरती आणि वैद्यकीय प्रवेशाला लागू केले. यावर आता न्यायालयाने सुनावणीदरम्यान, कोणतीही भरती ही न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहील, असे आदेश दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी मंगळवारी १२ मार्च रोजी पार पडणार आहे. Maratha Reservation

दरम्यान, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान मराठा आरक्षणानुसार कोणतीही भरती किंवा शैक्षणिक दाखले दिल्यास त्याबाबतचा निर्णय न्यायालयाच्या निर्णयावर अंवलबून असणार आहे, हे लक्षात ठेवा असे सरकारला बजावले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!