Maratha Reservation : मोठी बातमी! अखेर मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, सोबत लाखोंची गर्दी…


Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा जोरदार पेटला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची वाटचाल आजपासून मुंबईकडे झाली आहे. मोर्चाला सुरुवात होण्याआधीच अनेक मराठा बांधवांनी आंतरवाली सराटी या गावात मोठी गर्दी केली आहे .

ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात २६ जानेवारीला मुंबईत पदयात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी आज (ता.२०) मराठ्यांचे हे वादळ मुंबईकडे निघाले आहे.

दरम्यान, चलो मुंबई आंदोलन मागे घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना केले होते. तथापि, आता माघार नाही, मुंबईत आंदोलन होणारच, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

मी असेन किंवा नसेन, पण मराठ्यांमध्ये फूट पडून द्यायची नाही. छातीवर गोळ्या जरी घातल्या, तरी मागे हटणार नाही.” पुढे बोलत असताना ते म्हणाले की, ” मराठ्यांची मुलं संपवण्याचा घाट घातला जातोय. मराठ्यांची मुलं जीवन संपवत आहेत.

तरीही, सरकार गांभीर्यानं घेत नाही. उपोषणामुळे माझ शरीर साथ देत नाही. पण, लढाई टोकाची आहे. आता आरक्षण घेऊन मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे,” यावेळी ते भावूक झाले. Maratha Reservation

दरम्यान, जरांगेंसाठी खास व्हॅनिटी व्हॅन जरांगे यांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, या उद्देशाने बीडमधील मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक सुविधा असून, यात एका वैद्यकीय पथकाबरोबरच एसी, टी.व्ही., फ्रिज अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मुंबईतील आंदोलनाचा कार्यक्रम जरांगे यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यानुसार ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करून नंतर मराठा आंदोलक त्यांच्यासोबत मुंबईकडे कूच करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!