Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णय होत नाही, नैराश्यात हिंगोलीच्या युवकाचे टोकाचे पाऊल, संपूर्ण गावात हळहळ…


Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनीआत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचल आहे. अशातच आता मराठा आरक्षणासाठी हिंगोलीच्या खंडाळा येथील मराठा युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मराठा आरक्षणासाठी हिंगोली मध्ये दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली होती. या सभेच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आत्महत्या करू नका, निराश होऊन जाऊ नका तुम्ही आत्महत्या केल्यावर हे आरक्षण कोणासाठी घ्यायचे आणि याचा कोणाला फायदा घ्यायचा म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका, असेआवाहन केले होते. Maratha Reservation

विठ्ठल गायकवाडने असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या धक्कादाय घटना गावामध्ये कळताच एकच खळबळ उडाली आहे. मृत विठ्ठल हा मराठा आरक्षणाच्या लढ्यात नेहमी सक्रिय असल्याची माहिती मिळतांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

तसेच विठ्ठल गायकवाड यानं हिंगोली येथील झालेल्या विराट सभेत सहभाग घेतला होता. स्वयंसेवकाची जबाबदारी देखील त्यानं सभेदरम्यान पार पाडली होती.

पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊनही नोकरी नसल्याने आणि आरक्षणाचा तिढा सुटला नसल्याने परिणामी नैराशजन्य जीवन जगाव लागत असल्याने विठ्ठल यांने टोकाचे पाऊल उचलले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!