Maratha Reservation : मुंबईत घुसले मराठे!! धडकी भरण्यास सुरवात, मराठ्यांचा सीएसएमटीसमोर चक्काजाम….


Maratha Reservation : मराठा वादळ मुंबईपर्यंत जाऊन पोहोचले आहे. सीएसएमटीसमोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे सीएसएमटी परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. मराठा आंदोलकांनी सीएसटीच्या बाहेर आंदोलन सुरु केलं आहे.

शेकडोंच्या संख्येनं आंदोलक मुख्य रस्त्यावर बसले आहेत. दरम्यान आजचा दिवस (26 जानेवारी) मराठा आरक्षणासाठी निर्णायक राहणार आहे. सरकारी पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून तोडगा निघतो का? पाहिलं जात आहे.

सीएसटी परिसरात गर्दी झाल्यानंतर मुंबई पोलिस सक्रिय झाले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलकांना विनंती करून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी गर्भित इशारा दिला आहे. Maratha Reservationz

केवळ सीएसएमटी नाही, तर आम्ही संपूर्ण मुंबईचा ताबा घेणार आहोत, आंदोलकांना आवाहन करतोय की सर्वांनी आझाद मैदानात यावं असं त्यांनी म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!