मनोज जरांगे नावाचं वादळ आज पुण्यात ! सभेला गर्दीचा उच्चांक गाठणार ! सभेसाठी पर्यायी वाहतुकीत बदल ..!!

खराडी: सकल मराठा समाजाकडून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जंगी सभा पुण्यात होणार आहे. राज्यात जरांगे पाटील यांच्या सभेला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, पुण्यातील सभा कशी होणार म्हणून चर्चेला उधाण येऊ लागले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने पुण्यातील सभा उच्चांकी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून सकल मराठा समाजाच्या वतीने सभेची पूर्ण तयारी झाली आहे.


दरम्यान, सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुक कोंडीचा शहरात मोठा परिणाम होऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

असे असतील पर्यायी मार्ग?
नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकण, भोसरीमार्गे पुणे- मुंबईकडे वळवली जातील.
नगर रस्त्यावरून हडपसर, सासवड आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केसनंदमार्गे थेऊर फाटा येथून इच्छितस्थळी जावे.
सोलापूर रस्त्याने नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी थेऊर येथून इच्छितस्थळी जावे.
जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाहनांनी भोसरी, चाकण, शिक्रापूरमार्गे जावे.
वाघोलीकडून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद राहणार आहे.
असा असेल जरांगे पाटील यांचा दौरा
मनोज जरांगे पाटील हे १९ नोव्हेंबरला आळंदीत मुक्कामी आहेत. आळंदीतून सकाळी दर्शन घेऊन तुळापूर येथे येणार आहेत. तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढे खराडी येथील सभेला उपस्थित राहणार आहेत.
