Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, फक्त….!! मोठ्या नेत्याचे धक्कादायक आरोप

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर काही मागण्या पुर्ण व्हाव्या, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. सरकारला यावेळी गुडघ्यावर टेकवल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य देखील जरांगे यांनी केला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार परिणय फुके यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे यांना खरं तर मराठा समाजासाठी आरक्षण द्यायचं नाही, तर ते फक्त मीडियामध्ये राहण्यास उत्सुक आहेत. फुके यांनी अशी टीका केली आहे.

परिणय फुके पुढे म्हणाले की, जरांगे यांना खरं तर मराठा समाजासाठी आरक्षण द्यायचं नाही, तर ते फक्त मीडियामध्ये राहण्यास उत्सुक आहेत.जरांगे यांच्या वक्तव्यांमागे त्यांच्या अहंकाराची भावना आहे. जरांगे हे समाजाच्या मुद्द्यांवर लढत नाहीत, तर आपल्या महत्त्वाकांक्षांसाठी उपोषण करीत आहेत. Manoj Jarange Patil

त्यांनी स्पष्ट केले की, सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून १० टक्के आरक्षण दिले आहे, जे एक मोठे पाऊल आहे. ओबीसी समाजात ३५३ जातींच्या आरक्षणाची स्थिती लक्षात घेता, जर मराठा समाज EWS मध्ये समाविष्ट झाला तर आरक्षण कमी होईल. परिणय फुके यांनी हे सुद्धा सांगितले की, जरांगे यांचे उपोषण आणि वक्तव्ये केवळ मीडियामध्ये राहण्यासाठी आहेत.
