Manoj Jarange Patil : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांची सिद्धिविनायक मंदिराला भेट, देवस्थानचे विश्वस्त राजाराम देशमुखांनी केले जरांगे पाटलांचे स्वागत…

Manoj Jarange Patil मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. देवस्थानचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले व त्यांना सिद्धिविनायकाचा फोटो भेट दिला. Manoj Jarange Patil
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे परंतु अद्याप समाजाच्या मागणीला यश आलेले नाही. मनोज जरांगे पाटील हे सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी उपोषण केले होते.
सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली होती. आता ही वेळ संपत आलेली आहे. जरांगे पाटील यांच्या सभेला मराठा समाजाने मोठा प्रतिसाद दिला होता. Manoj Jarange Patil
आता पुणे जिल्ह्यात होणाऱ्या सभेची तयारी सुरु असून मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश येवो, असे सिद्धिविनायक मंदिराचे सर्वश्री विश्वस्त राजाराम देशमुख यांनी म्हटले आहे.