Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्याआधी ढसाढसा रडले, म्हणाले, ‘मी असेन नसेन…
Manoj Jarange Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा जोरदार पेटला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची वाटचाल आजपासून मुंबईकडे होणार आहे. मोर्चाला सुरुवात होण्याआधीच अनेक मराठा बांधवांनी आंतरवाली सराटी या गावात मोठी गर्दी केली आहे .
दरम्यान यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आता मागे हटायचं नाही काहीही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
शेकडो माता माऊलींच्या कपाळाला कुंकू राहिले नाही. सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं? आता या सरकारला नीट केल्याशिवाय मराठ्यांना शांत बसून चालणार नाही. असे देखील मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत. मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून आपण मुंबईला जाणार आहोत. Manoj Jarange Patil
त्यामुळे आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले. त्याचबरोबर मी असेल नसेल विचार जागे ठेवा. २६ तारखेला घराघरातील मराठा समाजाने मुंबईला यावं असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.