Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी खालावली, लिव्हर किडनीला सूज, चिंता वाढली


Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी ९ दिवसांनंतर आपले उपोषण सोडले आहे. मात्र उपोषणानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आली आहे. मागील उपोषणावेळच्या पेक्षा सध्या त्यांची तब्येत चिंताजनक आहे.

जरांगे पाटील यांना यावेळी अधिक त्रास झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पुढचे दोन आठवडे त्यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांची दिवाळी रुग्णालयाच होईल असं दिसत आहे. Manoj Jarange Patil

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वेळेच्या तुलनेत त्यांना यावेळी जास्त अशक्तपणा आहे. तसेच वजन देखील जास्त घटलं आहे. लिव्हर आणि किडनीचे पॅरामीटर देखील डिरेंज झाले आहेत. ब्लड प्रेशरही कमी आहे. या दृष्टीने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. Manoj Jarange Patil

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी २४ ऑक्टोबरपासून उपोषण सुरु केले होते. मराठा समाजास सरसकट कुणबी दाखले द्या, ही त्यांची प्रमुख मागणी होती. गुरुवारी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात जाऊन त्यांच्या चर्चा करण्यात आली.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची गेल्या नऊ दिवसात तपासणी झाली नव्हती. अखेर गुरुवारी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीचा शुक्रवारी अहवाल आला असून त्यामध्ये त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आल्याचे दिसत आहे. उपचारानंतर ते पूर्ण बरे होतील, असे डॉक्टर विनोद चावरे यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!