Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा पुण्यात धडकला, आंदोलनाचा आजचा चौथा दिवस..

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. जालना बीड आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
तसेच २२ जानेवारीला जरांगे पाटील यांनी रांजणगाव गणपती या ठिकाणी मुक्काम केला. आज सकाळी पुन्हा दहा वाजता जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत. आज दुपारचे भोजन भीमा कोरेगाव या ठिकाणी केले जाणार आहे.

तर आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदन नगर या ठिकाणी केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आणि उद्याचा प्रवास करून २६ जानेवारीला जरांगे पाटील मुंबई धडकणार आहे. Manoj Jarange


दरम्यान, जोपर्यंत आरक्षण घेणार नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये अनेक मराठा बांधवांनी आंदोलनाला उपस्थित राहावे असे आव्हान देखील त्यांनी केले आहे.
त्यामुळे २६ जानेवारीला मुंबईतील गल्ली-गल्लीत मराठे पाहायला मिळतील असा थेट इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. २५ जानेवारीनंतर मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांची संख्या वाढण्याची शक्यता असून, 26 ला मुंबईत मोठी गर्दी होण्याची देखील शक्यता आहे. तर, या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस लक्ष ठेवून आहे.