Mangaldas Bandal : मोठी बातमी! मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर व पुण्यातील निवासस्थानी ईडीच्या छापेमारीची चर्चा! पथक सहा तास उलटूनही निवासस्थानी तळ ठोकून…


Mangaldas Bandal शिक्रापूर : पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती पै. मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर व पुण्यातील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालय (ईडी )कडून आज सकाळी पहाटेच्या सुमारास धाड टाकण्याची चर्चा असून सुमारे सहा तासहून अधिक वेळ ही कारवाई सुरू असल्याची चर्चा
आहे.

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात एक वादळी व्यक्तिमत्त्व म्हणून मंगलदास बांदल हे नेहमी चर्चेत आहे. सक्तवसुली संचालयाने यापूर्वी बांदल यांच्या निवासस्थानी कारवाई करुन काही मालमत्ता सिल करण्याची कारवाई यापूर्वी केली आहे.  तर शिवाजीनगर सहकारी बॅकेतील अपहार प्रकरणी मंगलदास बांदल यांच्यावर कारवाई होऊन ते कारागृहात राहून जामीनावर बाहेर आहेत. Mangaldas Bandal

मागील लोकसभा निवडणुकीत त्यांना वंचित बहुजन आघाडीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र बांदल यांनीलोकसभेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने वंचित आघाडीने त्यांची उमेदवारी रद्द केली होती.

त्यानंतर त्यांनी महायुतीच्या सभांना हजेरी लावून त्यांनी प्रचार केला आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या ते जवळीक साधून् आहे. आज पहाटे बांदल यांच्या निवासस्थानी ईडीने पथक दाखल झाल्याची चर्चा असून त्यांच्यावर निवासस्थानी झाडाझडती सुरू आहे.दरम्यान या घटनेमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांचे धाबे दणाणणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!