मंदिर परिसरातील टिनच्या शेडवर कडुलिंबाचे झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू…!

30 हून अधिक जण जखमी...


अकोला : अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात पारस हे गाव आहे. इथे बरड परिसरात बाबूजी महाराज संस्थान म्हणजेच मंदिर आहे. काल रविवार असल्याने सायंकाळी आरतीसाठी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी असते.

 

याचदरम्यान आरती सुरू असताना  पावसामुळे टिनच्या शेडवर कडुलिंबाचे झाड पडले. या घटनेत शेड कोसळली. काही वेळातच घटनास्थळी राडा झाला.

 

अकोल्याच्या जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी सांगितले की, या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाले. अकोल्याच्या जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी शेडखाली सुमारे 40 लोक उपस्थित होते, त्यापैकी 36 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतांची संख्या सात झाली आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे.

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी ट्विटरवर लिहिले की, ही घटना वेदनादायक आहे. मी त्यांना माझ्या विनम्र संवेदना व्यक्त करतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!