क्रिकेट मनामनात रुजवणारा अलविया काळाच्या पडद्याआड!! लोकप्रिय क्रिकेट समिक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन…


मुंबई : क्रिकेट विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय क्रिकेट समिक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 74 वर्षाचे होते. त्यांनी मुंबईच्या लीलावती रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या निधनानंतर क्रिकेटसह राजकीय वर्तुळातून शोककळा पसरली आहे. साहित्याच्या विविध प्रकारातून क्रिकेट जगताची ओळख प्रत्येक क्रिकेटप्रेमी व्यक्तीला करून देणारे प्रख्यात क्रिकेट समीक्षक, लेखक आणि सूत्रसंचालक द्वारकानाथ संझगिरी अशी त्यांची ओळख होती.

यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने क्रिकेट समीक्षण क्षेत्रातील एक तारा निखळून गेला. क्रिकेट आणि मराठी साहित्यातील रूचीने त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला. मराठी क्रिकेटप्रेमींनी त्याच्या लिखाणाला नेहमीच पसंती दिली आहे.

दरम्यान, संझगिरी यांच्या निधनानंतर आता क्रिकेटसह राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. संझगिरी हे सिव्हिल इंजीनियर होते आणि मुंबई महापालिकेत ते उच्च पदावर कार्यरत होते. संझगिरी यांच्या निधनांतर आता क्रिकेट वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.

दरम्यान, द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने क्रिकेट समीक्षण क्षेत्रातील एक तारा निखळून गेला. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे. यामुळे दुःख व्यक्त केले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!